१५ हजार करोड़ (गंगा नदीच्या) पाण्यात ?

केंद्र सरकने गंगा नदीच्या शुद्धिकरणासाठी १५ हजार करोड रुपये मंजूर केले आहेत. तसे कर्ज जागतिक बॅकेने दीले आहे. बँकेलाच जास्त काळजी म्हणून त्यानी सरकारला १४०१३ करोड देतो असे सांगितले. पण शेवटी आपण ४६७१ कोटी रुपयांचे लॉंग टर्म कर्ज घेतले.
छान! म्हणजे आधी १०० करोड पाण्यात गेले आहेतच आता जरा जास्त !
प्रॉजेक्टची लाइफ १० वर्षे ठरवण्यात आली आहे.

म्हणजे ५-६ वर्षे शुद्धिकरणात १०-१२ हजार घालवल्यावर रिपोर्ट द्याचा की आता काम जरा कठीण झाले आहे, प्रॉजेक्ट ३-४ वर्षे हळू चालू आहे, आणि लोक अजूनही कचरा, नीर्माल्य , अस्ति, आणि सांड्पाणी सोडायचे काही बंद करत नाहीत. (म्हणजे आक्च्युयली मंत्री गण लोकाना तसे सांगातच नाही की बाबरे असे करू नका, ५ वर्षनि या नदीचे पाणी विषप्रात होणार आहे. आता वेळ आहे जागे व्हा!)

हे पहाणे गमतीचे असेल की आधीच १ लाख ७० हजार करोड रुपयांचे डिलेड प्रॉजेक्ट मजेत चालले आहेत आता एक नवीन! आणि हो नवीन कर्ज वाढतच आहे. पहिले ५,९६,०७७.२ करोड चे आणि आता नवीन ४६७१ करोड.
अमेरिकाने पाकिस्तानला १२०० करोड असेच दिले आहेत, लुटूपुटूची लढाई करायला. भारताला का मिळत नाही अशी वर्गणी?

खालील चित्र पहा, हे उदाहरण आहे सॅन दियागो शहरातले.

हा प्रॉजेक्ट आहे जवळपास २०० कोटी रुपयांचा.!!! स्वस्तात मस्त. अँड इट्स वर्किंग!!!

One thought on “१५ हजार करोड़ (गंगा नदीच्या) पाण्यात ?

 1. मराठीत & ते सुद्धा देवनागरीत, छान!
  असो, निर्माल्य आणि अस्थी विसर्जन वगैरे भानगडी भारत सोडून दुसरीकडे असतील कि नाही ते माहित नाही.
  & निर्माल्य बद्दल काही बोलणार नाही. कारण, त्याने पाणी खराब होणारच नाही.
  अस्थी विसर्जनाबाबत माझे ज्ञान काही नाही. अध्यात्मिक & Chemical composition बाबत पण!

  सॅन दियागो हे भारतात नाही ना, म्हणून तिथे ते होऊ शकलं.
  “are we ready to play war?” मध्ये दिलेल्या प्रतिक्रीये प्रमाणे कोणाला गरज वाटत नाहीये या सगळ्याची…
  (Most of the) भारतीय लोक गळ्याशी पाणी आल्याशिवाय पोहायचे कष्ट घेत नाहीत!

  पण आता ४६७१ कोटीचे कर्ज घेतले ना, मग कदाचित हात-पाय हलवतील राजकारणी लोक…
  कारण, सॅन दियागो सारखा शेम-टू-शेम करायचं म्हटलं तरी २०० कोटी लागतील…
  वरचे ४४७१ कोटीची मलई काढता येईल ना!!!! 😛
  बरं, प्रॉजेक्टची लाइफ १० वर्षे ठरवण्यात आली आहे. म्हणजे १५-२० वर्ष तरी लागणारच!
  तोपर्यंत सगळे जणं विसरतीलच ना…
  & १ लाख ७० हजार करोड रुपयांचे डिलेड प्रॉजेक्ट तुला पण माहिती आहेत, म्हणजे किती प्रोजेक्ट्स hidden असतील याचा विचार कर!
  पाण्यावर १/३ बोट दिसते, २/३ बोट तर पाण्याखाली असते!

  गम्मत वाढत्या कर्जाची नाहीये.. गम्मत वाटत्ये ती जागतिक बँकेची!
  ते अजून कर्ज द्यायला तयार होतात कसे?
  म्हणजे भारताकडे पैसे नाहीत असे नाही. फक्त “क्रिकेट” मधून मिळत असलेला पैसा खूप कर्ज फेडू शकेल.
  (Talking about legal money only!)

  अमेरिकाने पाकिस्तानला का दिले आहेत ते त्यांनाच माहिती.
  त्यांची तम-तम-मंदी** असेल काहीतरी…
  (** अर्थासाठी SRK सरांना भेटा.)

  BTW, भारतातही जल-शुद्धीकरणाचे प्रकल्प काही ठिकाणी सुरु आहेत, लहानश्या तत्वावर…
  & सॅन दियागो चा प्रोजेक्ट पण छान आहे!

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s